Sawaru Shakaloch Nasto

सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
याचसाठी चाललो...
याचसाठी चाललो नाही तुला बिलगून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी

आरशांच्या सारख्या भेटी मला देऊ नको
आरशांच्या सारख्या भेटी मला देऊ नको
पाहिला आहे स्वतःचा...
पाहिला आहे स्वतःचा चेहरा जवळूनी मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी

एकदा मी पाहिला अंधार माझ्या आतला
एकदा मी पाहिला अंधार माझ्या आतला
मग कधी ना पाहिले...
मग कधी ना पाहिले माझ्यात डोकावून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी

तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा
तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा
यात माझे काय चुकले...
यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी

सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
याचसाठी चाललो...
याचसाठी चाललो नाही तुला बिलगून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link