Dilacha Saatbara (From "Dilacha Saatbara")

भेटले आभाळ, सख्या, आज धरतीला
नव्या-नव्या प्रीतीचा नवा सिलसिला
भेटले आभाळ, सख्या, आज धरतीला
नव्या-नव्या प्रीतीचा नवा सिलसिला

उरामध्ये धडधडतंय, झोपेतही बडबडते
उरामध्ये धडधडतंय, झोपेतही बडबडते
ध्यास जीवा, तुझाच रे सारा

तुझ्यासाठी, तुझ्यासाठी ठेवलाय कोरा
दिलाचा सातबारा
तुझ्यासाठी ठेवलाय कोरा
दिलाचा सातबारा

स्वप्नापरी का दिसते जग हे? ओढ नवी लागली
नाही समजले, नाही कळले प्रीत उरी जागली
स्वप्नापरी का दिसते जग हे? ओढ नवी लागली
नाही समजले, नाही कळले प्रीत उरी जागली

रेशमाच्या बंधनात, काळजाच्या स्पंदनात
रेशमाच्या बंधनात, काळजाच्या स्पंदनात
प्रिया, तुझ्या नावाचाच नारा

तुझ्यासाठी, तुझ्यासाठी ठेवलाय कोरा
दिलाचा सातबारा
तुझ्यासाठी ठेवलाय कोरा
दिलाचा सातबारा

मोरपिसाचे तुझे स्पर्श रे, तन ही शहारले
बंद ओठ, नयन तुझे बोलके, भाव झंकारले
मोरपिसाचे तुझे स्पर्श रे, तन ही शहारले
बंद ओठ, नयन तुझे बोलके, भाव झंकारले

प्रीत गुणगुणते रे, सुख रुणझुणते रे
प्रीत गुणगुणते रे, सुख रुणझुणते रे
पाकळीस खुलवतोय वारा

तुझ्यासाठी, तुझ्यासाठी ठेवलाय कोरा
दिलाचा सातबारा
तुझ्यासाठी ठेवलाय कोरा
दिलाचा सातबारा

मनोमनी रे, तुझ्याच चाहुली, मन बेभानते
तूच माझा प्रेमाचा श्वास रे, इतकीच जाणते
मनोमनी रे, तुझ्याच चाहुली, मन बेभानते
तूच माझा प्रेमाचा श्वास रे, इतकीच जाणते

काळजाला भावणारा, हुरहूर लावणारा
काळजाला भावणारा, हुरहूर लावणारा
क्षण कधी येईल रे, यारा?

तुझ्यासाठी, तुझ्यासाठी ठेवलाय कोरा
दिलाचा सातबारा
तुझ्यासाठी ठेवलाय कोरा
दिलाचा सातबारा



Credits
Writer(s): Sandeep Bhure, Parshuram Bagade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link