Sajana Re (From "Sajana Re")

सुख किती वाटे जवळ तू असता रे
हुरहूर वाढे अशी दूर तू जाता रे
सुख किती वाटे जवळ तू असता रे
हुरहूर वाढे अशी दूर तू जाता रे

शोधते मी तुला आता जिथे-तिथे
दिसतो तूच तू मग काही ना सुचे
जुळले तुझ्यासवे रेशीमबंध हे

साजणा रे, साजणा रे
साजणा रे, साजणा रे

आजकाल बेचैनी असते का?
उगा काहूर मनी झरते का?
आजकाल बेचैनी असते का?
उगा काहूर मनी झरते का?

गुज सांगू कसे माझ्या मनातले?
समजून घे कधी या डोळ्यातले
उरले काही ना आता माझे रे

साजणा रे, साजणा रे
साजणा रे, साजणा रे

हरवून जाते मी अशी का?
साद माझ्या कानी तुझी येता
हरवून जाते मी अशी का?
साद माझ्या कानी तुझी येता

स्वप्नात रमते मी भर दिवसाचं
भान नाही मला आता स्वतःच
झोंबतो गारवा का नव्याने रे?

साजणा रे, साजणा रे
साजणा रे, साजणा रे

नाव तुझं माझ्यासंग जोडते
अन गालात थोडी हसते
नाव तुझं माझ्यासंग जोडते
अन गालात थोडी हसते

साज-शृंगार माझा तुझ्यासाठी
वाट बघते मी वेडी होऊनी
छळते आठवण तुझी मनाला रे

साजणा रे, साजणा रे
साजणा रे, साजणा रे
साजणा रे, साजणा रे



Credits
Writer(s): Sandeep Bhure, Rahul Vitthalrao Kale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link