Mi Prem Nagarcha Raja

मी प्रेम नगरचा राजा, तु फुलवंती मधुराणी
प्रीतीच्या राजकुमारा मी झाले प्रेम दिवाणी
रंगुनी जाऊ, धुंदावूनी गाऊ आम्ही दोघं राजा-राणी
Hey, हात हाती घेऊ, दूर-दूर जाऊ आम्ही दोघं राजा-राणी

मी प्रेम नगरचा राजा, तु फुलवंती मधुराणी
प्रीतीच्या राजकुमारा मी झाले प्रेम दिवाणी

पाहीन वाट तुझी (अच्छा) येशील तु थकुनी (uhmm)
घास तुला देते (ओहो) अमृत भर-भरुनी
घेईन जवळी तुला (अय्या) लाजून होशील चूर (अईशा)
नको-नको म्हणताना प्रणया येईल पूर

प्रेम संगमी एक जाहलो
आम्ही दोघं राजा-राणी

मी प्रेम नगरचा राजा, तु फुलवंती मधुराणी
प्रीतीच्या राजकुमारा मी झाले प्रेम दिवाणी
रंगुनी जाऊ, धुंदावूनी गाऊ आम्ही दोघं राजा-राणी
हाय, हात हाती घेऊ, दूर-दूर जाऊ आम्ही दोघं राजा-राणी

मी प्रेम नगरचा राजा, तु फुलवंती मधुराणी
प्रीतीच्या राजकुमारा मी झाले प्रेम दिवाणी

जादू कशी सरली (असं का) गोड-गोड स्वप्नांची (uhmm)
नशिबी ही आली (अरे बापरे) फलटण पोरांची

घरकुल दोघांचे (बोंबला) प्रजा किती झाली (बघना)
कटकट कर्माची (अरे मेलो बाबा) पदरी ह्यो पडली

सांगू कुणाला विटलो जगाला
आम्ही दोघं राजा-राणी

मी प्रेम नगरचा राजा, तु फुलवंती मधुराणी
प्रीतीच्या राजकुमारा मी झाले प्रेम दिवाणी
रंगुनी जाऊ, धुंदावूनी गाऊ आम्ही दोघं राजा-राणी
हात हाती घेऊ, दूर-दूर जाऊ आम्ही दोघं राजा-राणी

Credits
Writer(s): Ram Laxman, Vandana Vitankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link