Tujhi Majhi Jodi Jamli

अगं हेमा, माझ्या प्रेमा
Hey, तुझी-माझी जोडी जमली गं
अशी झक्कास पोरगी पटली
तुझी-माझी जोडी जमली गं
अशी झक्कास पोरगी पटली

गोरी-गोरी, कोरी-कोरी
इश्काची नोट ही वटली, हाय-हाय
लाडी-गोडी अशी केलीस तु कि
पतंग माझी कटली

लाडी-गोडी अशी केलीस तु कि
पतंग माझी कटली

निळ्या-निळ्या नभात या
दोघांची प्रीती नटली, हाय-हाय
Hey, तुझी-माझी जोडी जमली गं
अशी झक्कास पोरगी पटली

थोडीशी मी लाजाळू, ज्वानी कशी सांभाळु?
भीती तुला कसली गं? मनात प्रीती वसली गं

तुझी-माझी जोडी जमली गं
अशी झक्कास पोरगी पटली
हा, लाडी-गोडी अशी केलीस तु कि
पतंग माझी कटली

जाईजुई, शेवंती, तशीच मी रे लजवंती
पाहूनी तुजला जीव हा फुलला
गंधाने मन हे न्हाले

माझी गं तु गुढवंती, मिठीत ये ना फुलवंती
ठुमकत, मुरडत जाऊ नको तु, मोहून मन हे गेले

अगं हेमा, माझ्या प्रेमा
Hey, तुझी-माझी जोडी जमली गं
अशी झक्कास पोरगी पटली
लाडी-गोडी अशी केलीस तु कि
पतंग माझी कटली

गुलाबाची लाली तुझ्या गालावरी कशी आली गं?
ओठात लपली प्रीती ही आपली
लाजेनं बहरून आली गं
प्रेमाच्या या खाणाखुणा मुक्यान घ्याव्या जाणून

डोळ्यातं टिपलं, मनात जपलं
प्रीतीचं फूल मी गोडिनं

अगं हेमा, माझ्या प्रेमा
Hey, तुझी-माझी जोडी जमली गं
अशी झक्कास पोरगी पटली
Hey, तुझी-माझी जोडी जमली गं
अशी झक्कास पोरगी पटली

गोरी-गोरी, कोरी-कोरी
इश्काची नोट ही वटली, हाय-हाय
लाडी-गोडी अशी केलीस तु कि
पतंग माझी कटली

हा, लाडी-गोडी अशी केलीस तु कि
पतंग माझी कटली
निळ्या-निळ्या नभात या
दोघांची प्रीती नटली, होय-होय

हा तुझी, हा माझी, हा जोडी
जमली, जमली, जमली, ढिंकाचिका
Hey, जोडी जमली



Credits
Writer(s): Shantaram Nandgavkar, Arun Paudwal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link