Aala Abhal Bharun

आलं आभाळ भरून, आता येईल पाऊस
रानोवनी-पानोपानी...
रानोवनी-पानोपानी धुंद होईल पाऊस

आलं आभाळ भरून, आता येईल पाऊस
रानोवनी-पानोपानी...
रानोवनी-पानोपानी धुंद होईल पाऊस
आलं आभाळ भरून...

असा पाऊस झिम्माड, चिंब भिजेल अंगण
सर भिजवी मनास जसे थेंबांचे गोंदण
असा पाऊस झिम्माड, चिंब भिजेल अंगण
सर भिजवी मनास जसे थेंबांचे गोंदण

थेंबा-थेंबाचे तराने...
थेंबा-थेंबाचे तराने आता गायील पाऊस
आलं आभाळ भरून...

गेली शहारून झाडे गंध मातीचा लेवून
आणि वाऱ्याला भेटली पाने ओली ती होऊन
गेली शहारून झाडे गंध मातीचा लेवून
आणि वाऱ्याला भेटली पाने ओली ती होऊन

जिथे बोलावेल वारा...
जिथे बोलावेल वारा तिथे जाईल पाऊस
आलं आभाळ भरून...

ओल्या मधाळ हवेत येई हळूच गारवा
सूर घेऊन नभाचा पावसाचा रंग नवा
ओल्या मधाळ हवेत येई हळूच गारवा
सूर घेऊन नभाचा पावसाचा रंग नवा

खुळ्या धरीला मिठीत...
खुळ्या धरीला मिठीत मग घेईल पाऊस

आलं आभाळ भरून, आता येईल पाऊस
रानोवनी-पानोपानी.
रानोवनी-पानोपानी धुंद होईल पाऊस
आलं आभाळ भरून...



Credits
Writer(s): Prashant Madpuwar, Abhijit Rane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link