Ghagar Gheun

घागर घेऊन, नटून-थटून यमुने तीरी येई राधा
जरा वळूनी, मज पाहुनी खुळी-बावरी होई राधा
ये, घागर घेऊन, नटून-थटून यमुने तीरी येई राधा
जरा वळूनी, मज पाहुनी खुळी-बावरी होई राधा

चोरून पाहून, गालात लाजून
चोरून पाहून, गालात लाजून वेड लाउनी जाई राधा, राधा
राधा-राधा-राधा माझी राधा
हो, राधा-राधा-राधा माझी राधा
हे, राधा-राधा-राधा माझी राधा
हो, राधा-राधा-राधा माझी राधा

चांदन पैंजण पायात घालून चालते अशी गं तू राधा
साखर गोडवा जुरात माळून बोलते मधाळ सखे ही राधा
हो, चांदन पैंजण पायात घालून चालते अशी गं तू राधा
साखर गोडवा जुरात माळून बोलते मधाळ सखे ही राधा
डोळ्यात काजळ, नजर खट्याळ, डोळ्यात काजळ, नजर खट्याळ
हरवले मन माझे राधा, राधा
राधा-राधा-राधा माझी राधा
हो, राधा-राधा-राधा माझी राधा

उंच आभाळी, सोनसकाळी झोका मनाचा घेई राधा
बासरीची या धून ऐकुनी शहारूनी धुंद वेडी होई राधा
शहारूनी धुंद वेडी होई राधा
उनाड होऊनी, बेभान होऊनी
उनाड होऊनी, बेभान होऊनी भिरभिर मन माझे राधा
राधा-राधा-राधा माझी राधा
हो, राधा-राधा-राधा माझी राधा
राधा-राधा-राधा माझी राधा

होय, घागर घेऊन, नटून-थटून यमुने तीरी येई राधा
जरा वळूनी, मज पाहुनी खुळी-बावरी होई राधा
चोरून पाहून, गालात लाजून
चोरून पाहून, गालात लाजून वेड लाउनी जाई राधा
राधा-राधा-राधा माझी राधा
हो, राधा-राधा-राधा माझी राधा
अरे, राधा-राधा-राधा माझी राधा
राधा-राधा-राधा माझी राधा
राधा-राधा-राधा माझी राधा
हो, राधा, हो, राधा



Credits
Writer(s): Prashant Madpuwar, Abhijit Rane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link