Prathana Deva Tumhala

प्रार्थना देवा, तुम्हाला मागणे देवा
तुम्हाला मागणे देवा
नव्या जगाचे ज्ञान आम्हा लाभ सदा व्हावा
दिवसभरी रविराज येई चंद्रमा रात्री

त्यासह चांदण्या येती
आम्हीच पाहू तेव्हा कैसे येती ते जाती
ताईच्यासह जाऊ पाहू पशु, पक्षी, प्राणी
खेळही खेळू उद्यानी

डोंगर चढुनी झरे नद्यांची गावूया गाणी
झाडे-झुडपे, वेली नाना प्रकार ते पाहू
पाहुनी आनंदीत होऊ
रंग फुलांचे, चवी फळांच्या नित्य नव्या घेऊ

आई, बाबा, भावंडांच्या संगतीत राहू
सदोदित आनंदीत होऊ
घरात आणि शाळेमागी सुखी सदा होऊ

प्रार्थना देवा, तुम्हाला मागणे देवा
तुम्हाला मागणे देवा
नव्या जगाचे ज्ञान आम्हा लाभ सदा व्हावा



Credits
Writer(s): Traditional, Shri Takwardekar Guru Ji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link