Ghe Saawrun (From "Ringa Ringa")

धार दाटला, बेभानल्या दिशा
चकव्यात उभी, अंगार उरी विझलेला
हि साद की तुझा आभास साजणा
गंधाळून येई देह पुन्हा मिटलेला
विझल्या, विझल्या राखेत नवा
वणवा कुठला उमजेना
झुरला, विरला, जीव आतुरला
का आज असा समजेना
आसावला जीव, गेलं हरपून भान
घे सावरून मन हे साजणा

काळजाच्या देशाला, जिव्हाराच्या वेशीला
आठवांचा मेघ दाटला
सुन्या सुन्या एकांती, तुझ्या चाहुली येता
उजळून जाती दिशा
आता जिथे तिथे तुझे जरी होती भास रे
श्वासांत गंध हा असा तुझी लावी आस रे



Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale, Guru Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link