Man Phiruni

नसण्यातही असणे तुझे, असण्यात ही जुने
नसण्यातही असणे तुझे, असण्यात ही जुने
ओठांवरी हसणे जुने, मौनातही मन सुने

आता कसे सांगायचे? वाऱ्यावरी बोलायचे
आता कसे सांगायचे? वाऱ्यावरी बोलायचे
कुठल्या नभी थांबायचे? शोधायचे

मन फिरुनी, फिरुनी, फिरुनी
मन फिरुनी, फिरुनी, फिरुनी
मन फिरुनी, फिरुनी, फिरुनी
मन फिरुनी, फिरुनी, फिरुनी

साऱ्या खुणा नव्या आज का?
भांबावली अजून सांज का?
श्वासांवरी अजून साज का?
हळव्या क्षणा नवी लाज का?

भरल्या मुठी सारे तुझे
भरल्या मुठी सारे तुझे, सुटता क्षणी सारे रिते
शून्यात ही रमणे तुझे, माझ्यावरी हसणे खुजे
सारे कसे थांबायचे? सांगायचे

मन फिरुनी, फिरुनी, फिरुनी
मन फिरुनी, फिरुनी, फिरुनी
मन फिरुनी, फिरुनी, फिरुनी
मन फिरुनी, फिरुनी, फिरुनी

आज पुन्हा नव्याने भेटना
वाट नवी नव्याने चालना

भरली उरी स्वप्ने नवी
सरली भीती, सजल्या दीठी
भरली उरी स्वप्ने नवी
सरली भीती, सजल्या दीठी

आता पुन्हा धावायचे, वाऱ्यावरी गोंदायचे
आपल्या नभी थांबायचे, शोधायचे

मन फिरुनी, फिरुनी, फिरुनी
मन फिरुनी, फिरुनी, फिरुनी
मन फिरुनी, फिरुनी, फिरुनी
मन फिरुनी, फिरुनी, फिरुनी



Credits
Writer(s): Hrishikesh, Jasraj, Sameer Vidhwans, Saurabh
Lyrics powered by www.musixmatch.com

Link