Kiti Sangaichay Mala

Hmm, किती सांगायचय...
किती सांगायचय मला, किती सांगायचय
किती सांगायचय मला, किती सांगायचय

कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती
बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती
बेचैन स्वप्नांची अन पाखरे हरून जाती
मनाच्या पाऱ्याला आवरू किती

किती सांगायचय मला, किती सांगायचय
किती सांगायचय मला, तुला किती सांगायचय

मना हवे असे अलवारसे
कोणा कसे सांगायचे हे गाणे?
मना माझ्या जगी जा रंगुनी
पाहून घे तु ही हे स्वप्न दिवाने

हलके-हलके सुख हे बरसे
हलके-हलके सुख हे बरसे

मनाच्या पाऱ्याला असे स्वप्नांचे बहर
मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर
घेऊ दे मनाला श्वास मोकळा

किती सांगायचय मला, किती सांगायचय
किती सांगायचय मला, तुला किती सांगायचय
किती सांगायचय मला, किती सांगायचय
किती सांगायचय मला, तुला किती सांगायचय

हसऱ्या सुखाचा पहिला-वहिला मोहर हा
थकल्या जीवाला पहिल्या सरीचा दरवळ हा
क्षण हे हळवे जपावे (जपावे), इवल्या ओठी हसावे
आज चिंब व्हावे, पार पैल जावे

किती सांगायचय मला, किती सांगायचय
किती सांगायचय मला, तुला किती सांगायचय

मनाच्या पाऱ्याला असे स्वप्नांचे बहर
मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर
मनाच्या या गावी असे दोघांचेच घर
घेऊ दे मनाला श्वास मोकळा



Credits
Writer(s): Hrishikesh Datar, Jasraj, Saurabh, Spruha Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link