Utha Utha Raya (From "Asha Asavya Suna")

ओ, उठा-उठा, राया, बघा झुंजूमुंजू झालं
काळ्या मेघांनी आकाश भरलं, ओ

मृगनक्षत्र दारात आलं
मृगनक्षत्र दारात आलं
मृगनक्षत्र दारात आलं, आलं-आलं

गेल्या वर्षी खुप मेहनत केली
गेल्या वर्षी खुप मेहनत केली
फळाविना सारी वाया गेली
फळाविना सारी वाया गेली

त्या चिंतेनं...
त्या चिंतेनं काया माझी माळली

मन पुसतंय...
मन पुसतंय, "असं-कसं झालं?"
मन पुसतंय, "असं-कसं झालं-झालं?"
मृगनक्षत्र दारात आलं
मृगनक्षत्र दारात आलं

औंदा कसून जमिना नांगरा
औंदा कसून जमिना नांगरा
चांगलं जसं बियाणं पेरा
हो, चांगलं जसं बियाणं पेरा

मोती घेऊन येतील मेघधारा
मोती घेऊन येतील मेघधारा

माझी जमीन सुपीक लाल-लाल
माझी जमीन सुपीक लाल-लाल
माझी जमीन सुपीक लाल-लाल, लाल
मृगनक्षत्र दारात आलं
मृगनक्षत्र दारात आलं

शेतकरी बाणा आता दावा
हो, शेतकरी बाणा आता दावा
कणाकणात दाणं पिकवा
हो, कणाकणात दाणं पिकवा

हिरव्या कांतीची पताका लावा
हिरव्या कांतीची पताका लावा

लाल मातीवर घाला हिरवी शाल
लाल मातीवर घाला हिरवी शाल
लाल मातीवर घाला हिरवी शाल, शाल
मृगनक्षत्र दारात आलं

मृगनक्षत्र दारात आलं
मृगनक्षत्र दारात आलं



Credits
Writer(s): Mama Meherkar, S Gujar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link