Sona Nana Nag (From "Sunbai Oti Bharun Ja")

सोनं-नाणं नगं
दाग-दागिन नगं
हो, सोनं-नाणं नगं
दाग-दागिन नगं

काळ्या पोती समोर मोती
मातीमोल ठरलं
काळ्या पोती समोर मोती
मातीमोल ठरलं

विश्वासानं गळ्यात
माझ्या बांधा डोरलं
विश्वासानं गळ्यात
माझ्या बांधा डोरलं

धन-दौलत ही सारी खोटी
बाई भुकेली पिरतीसाठी
धन-दौलत ही सारी खोटी
बाई भुकेली पिरतीसाठी

जीव जीवाला देणाऱ्याला
प्राण पणानं वरलं
जीव जीवाला देणाऱ्याला
प्राण पणानं वरलं

अहो, विश्वासानं गळ्यात
माझ्या बांधा डोरलं
विश्वासानं गळ्यात
माझ्या बांधा डोरलं

तुमच्यावर मी करते माया
एकनिष्ठ मी ऱ्हाईन, राया
तुमच्यावर मी करते माया
एकनिष्ठ मी ऱ्हाईन, राया

पतीप्रेमानं सौभाग्याच
कुंकू भाळी कोरलं
पतीप्रेमानं सौभाग्याच
कुंकू भाळी कोरलं

आता विश्वासानं गळ्यात
माझ्या बांधा डोरलं
विश्वासानं गळ्यात
माझ्या बांधा डोरलं

युगे-युगे मी हसत चालले
सौभाग्याचे पाच पाऊले
युगे-युगे मी हसत चालले
सौभाग्याचे पाच पाऊले

जन्मोजन्मी भेटू आपण
असच होतं ठरलं
जन्मोजन्मी भेटू आपण
असच होतं ठरलं

आता विश्वासानं गळ्यात
माझ्या बांधा डोरलं
विश्वासानं गळ्यात
माझ्या बांधा डोरलं



Credits
Writer(s): Bathth Paththsule, M Devkate
Lyrics powered by www.musixmatch.com

Link