Rangi Tujya

रंगी तुझ्या अशी रंगले
श्वास माझे-तुझे एक होती जसे
रंगी तुझ्या अशी रंगले
श्वास माझे-तुझे एक होती जसे
रंगी तुझ्या अशी रंगले

रोम रोमातुनी सूर साकारते
गीत हे अंतरी मोहरु लागले
रंगी तुझ्या अशी रंगले

सहज येऊन ते तुझे हासूनी बोलणे
गहन डोळ्यातूनी तसे आर्जवी पाहणे
सस्पर्शातुनी माझे-तुझे धुंदावणे

हासरी, लाजरी मी आता राहते
प्रेमवेडी दिशा चालती पाऊले
रंगी तुझ्या अशी रंगले

मधुर मोहात गुंतल्या हृदयीचा भाव तू
तरल माझ्या मनातली लाडके नाव तू
माझ्या-तुझ्या प्रीतीतला एकांत तू
भेटण्याची तुझ्या वाट मी पाहते
का असे रे मना वेड तू लावले

रंगी तुझ्या अशी रंगले
श्वास माझे-तुझे एक होती जसे
रंगी तुझ्या अशी रंगले



Credits
Writer(s): Milind Joshi, Avinash Vishwajeet
Lyrics powered by www.musixmatch.com

Link