Radha Diwani Re

राधा दिवाणी रे, ओली कहाणी रे
हो, राधा दिवाणी रे, ओली कहाणी रे
सावळी-सावळी, साद ही सावळी
शाम नाही कुठे शोधते रे?

राधा ओ, दिवाणी रे, ओली कहाणी रे
राधा दिवाणी रे...

कालिंदीच्या तिरावरती निळसर बोली ऐकावी
मोरपिसाच्या स्पर्शामधली रेशीम चाहूल शोधावी
इशारा त्याचा साधा, बावरी होते राधा
इशारा त्याचा साधा, बावरी होते राधा

वाहती-वाहती सूर हे भारले
शामरंगी धुके साहते रे
राधा हो, दिवाणी रे, ओली कहाणी रे
राधा दिवाणी रे, ओली कहाणी रे

रुसली राधा जेव्हा कान्हा आला नाही भेटाया
गोकुळ सारे रंगून गेले शाम सुखाची ही माया
भेटला यमुनेकाठी, सावळ्या रेशीमगाठी
भेटला यमुनेकाठी, सावळ्या रेशीमगाठी

चांदणे-चांदणे बरसते अंगणी
रंगले मोहना अंग माझे
राधा हो, दिवाणी रे, ओली कहाणी रे
राधा दिवाणी रे, ओली कहाणी रे

सावळी-सावळी, साद ही सावळी
शाम नाही कुठे शोधते रे?
राधा दिवाणी रे, ओली कहाणी रे
राधा दिवाणी रे...



Credits
Writer(s): Ashwini Shende, Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link