Kanha Kanha Re

देही श्रावण झरतो गं, मनात पाऊस उरतो गं
देही श्रावण झरतो गं, मनात पाऊस उरतो गं
उगाच ह्या सुरातुनी नको खुणावू, जाना

कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा
कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा
(कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा)
(कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा)

देही श्रावण झरतो गं, मनात पाऊस उरतो गं
उगाच ह्या सुरातुनी नको खुणावू, जाना

कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा
कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा

रुजून येशी सरीतुनी पाऊस या देहावर
दिसशी जागोजागी तु, सावली तुझी अनावर
आभाळाला पुसुनिया तुझा स्पर्श उरला रे
तु नसताना चंद्र खुळा सारी रात पुरला रे

किती रेशमी निळसरले, पुढचा रस्ता धूसर
पाऊल चुकले खुद उगा वणवण मी फिरताना

कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा
कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा
(कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा)
(कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा)

गोपी साऱ्या भिजल्या रे, तुझ्या रूपाचा पूर
मी ही एक प्रेमदिवानी, गाव राहिला दूर
मोरपीसाना फुलवी हा गोऱ्या-गोऱ्या राधा
ना मी राधा, ना मीरा, तरीही जळते बाधा

तुझीच मुरली होऊन मी ओठांपाशी येईन
मधाळ ह्या क्षणातुनी मला छेडुनी जा ना

कान्हा, कान्हा, कान्हा, कान्हा
हो, कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा
कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा, कान्हा



Credits
Writer(s): Ashwini Shende, Nilesh Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link