Khel Range Rangat

शब्द-शब्द हा बोलण्यासाठी
मनातले भाव उलगडण्यासाठी
गाण्याच्या सुरात तुला पाहिले
पाहताच धावले भेटण्यासाठी

त्याच्या मनातले भाव तिला उमजले
तीचं मन धाव घेऊ लागलं
ती आली तिची नजरा-नजर झाली
आकाशी मंद-मंद प्रकाशाची ज्योत पसरली

आणि चंद्राच्या साक्षीनं
दोन नयनांचा खेळ रंगायला लागला
खेळ खेळावा जो रंगात यावा
साक्षीला चंद्रमा नभात असावा

खेळ रंगे रंगात...
खेळ रंगे रंगात तुझ्यासोबती, तुझ्यासोबती
मंद-मंद हा प्रकाश चंद्रमा नभी, चंद्रमा नभी
खेळ रंगे रंगात तुझ्यासोबती, तुझ्यासोबती
मंद-मंद हा प्रकाश चंद्रमा नभी, चंद्रमा नभी
मंद-मंद हा प्रकाश चंद्रमा नभी, चंद्रमा नभी

हास्य तुझे, बोल तुझे भुलविते मला
क्षणाक्षणांला ते फुलविते मला
हास्य तुझे, बोल तुझे भुलविते मला
क्षणाक्षणांला ते फुलविते मला

जपणार क्षण हे मी...
जपणार क्षण हे मी तुझ्यासंगती, तुझ्यासंगती
मंद-मंद हा प्रकाश चंद्रमा नभी, चंद्रमा नभी
मंद-मंद हा प्रकाश चंद्रमा नभी, चंद्रमा नभी

स्वप्न माझे आज पुरे जाहले असे
शब्दाविन बोलले हे डोळे तुझे
स्वप्न माझे आज पुरे जाहले असे
शब्दाविन बोलले हे डोळे तुझे

प्रेमाचा मोर नाचे...
प्रेमाचा मोर नाचे, पंख हालती, पंख हालती
मंद-मंद हा प्रकाश चंद्रमा नभी, चंद्रमा नभी
मंद-मंद हा प्रकाश चंद्रमा नभी, चंद्रमा नभी

कळ्या-पाकळ्यांची ही झाली फुले
प्रेमाच्या पानावर मन हे झुले
कळ्या-पाकळ्यांची ही झाली फुले
प्रेमाच्या पानावर मन हे झुले

नव्या-नव्या स्वप्नांचे...
नव्या-नव्या स्वप्नांचे झुले झुलती, झुले झुलती
मंद-मंद हा प्रकाश चंद्रमा नभी, चंद्रमा नभी
मंद-मंद हा प्रकाश चंद्रमा नभी, चंद्रमा नभी

खेळ रंगे रंगात...
खेळ रंगे रंगात तुझ्यासोबती, तुझ्यासोबती
मंद-मंद हा प्रकाश चंद्रमा नभी, चंद्रमा नभी
मंद-मंद हा प्रकाश चंद्रमा नभी, चंद्रमा नभी
मंद-मंद हा प्रकाश चंद्रमा नभी, चंद्रमा नभी

Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link