Tuch Mala Havi

आवड माझी जी तुझी, साद तुला माझ्या मनाची
कळले नाही कधी? केव्हा जुळले नाते तुझ्या मनाशी?
प्रीतीला चढणाऱ्या या लाल रंगाची
लालिमा बघून त्याला राहवत नाही
मखमली स्पर्श त्याला स्वस्थ बसू देत नाही
तो म्हणतो "आहे हे असे आहे
साक्षीला तो रवी आहे
मी तुझा, तू माझी
तूच मला हवी आहे, तूच मला हवी आहे"

तूच मला हवी, तूच मला हवी
तूच मला हवी, तूच मला हवी
तूच मला हवी, तूच मला हवी
फुलेल काय प्रीतीस या पालवी नवी?
पालवी नवी?

तूच मला हवी, तूच मला हवी, हा
तूच मला हवी, तूच मला हवी, हाहा

स्मरणी माझ्या ते दिवस, खुणा तुझ्या प्रेमाच्या
साद घाली आठवणी तुझ्या प्रीतीच्या
साद घाली आठवणी तुझ्या प्रीतीच्या

स्मरणी माझ्या ते दिवस, खुणा तुझ्या प्रेमाच्या
साद घाली आठवणी तुझ्या प्रीतीच्या
साद घाली आठवणी तुझ्या प्रीतीच्या

ओढ लागली तुझी, ओढ लागली, हे
ओढ लागली तुझी, ओढ लागली
फुलेल काय प्रीतीस या पालवी नवी?
हाय, पालवी नवी?

तूच मला हवी, तूच मला हवी, हा
तूच मला हवी, हे तूच मला हवी ना

मखमली स्पर्श तुझा कोरला उरी असा
जरी तू दूर, आज मी असे जवळ तुझ्या
जरी तू दूर, आज मी असे जवळ तुझ्या

हे, मखमली स्पर्श तुझा कोरला उरी असा
जरी तू दूर, आज मी असे जवळ तुझ्या
जरी तू दूर, आज मी असे जवळ तुझ्या

याद तुझी आली, याद तुझी आली
याद तुझी आली, याद तुझी आली
फुलेल काय प्रीतीस या पालवी नवी?
हा, पालवी नवी?

तूच मला हवी, हे तूच मला हवी
तूच मला हवी, तूच मला हवी हा

मंतरलेली गाठ ही स्वर्गात बांधली
वाट आज पाहतो रेशमी क्षणांची

मंतरलेली गाठ ही स्वर्गात बांधली
वाट आज पाहतो रेशमी क्षणांची

प्रीत जागली नवी, प्रीत जागली नवी
प्रीत जागली नवी, प्रीत जागली नवी
फुलेल काय प्रीतीस या पालवी नवी?
हाय, पालवी नवी?

तूच मला हवी, तूच मला हवी, हा
तूच मला हवी, तूच मला हवी
तूच मला हवी, तूच मला हवी



Credits
Writer(s): Nandu Honap, Rajan Laakhe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link