Hey Priya Sangu Kashe

मी मनात शोधते, मी तनात शोधते
मी शोधते अंतरी झरा प्रीतीचा
प्रीतीचा झरा वाहायला लागला
की त्याला बांध घालणं कठीण असतं

हातावरच्या ओल्या मेहंदीच्या रेषा
ह्या तिच्या मनात, त्याच्या आठवणीचे
तरंग उमटवू लागले
मी अशी-कशी ह्याच्या आधीन झाले
हे कोडं तीच तिलाच उलगडत नव्हतं

तिला मनातला गुंता कसा सांगावा
याचा प्रश्न पडतो, ती विचारते
Hey, प्रिया सांगू कसे? कशी तुझ्यात गुंतले
आणि स्वतःच पुढं उत्तरही देऊन जाते
बहरल्या दशदिशा रोमरोम फुलले

Hey, प्रिया सांगू कसे? कशी तुझ्यात गुंतले
Hey, प्रिया सांगू कसे? कशी तुझ्यात गुंतले
बहरल्या दशदिशा...
बहरल्या दशदिशा, रोमरोम फुलले
Hey, प्रिया सांगू कसे? कशी तुझ्यात गुंतले

ध्यास तुझा माझ्या मनी एकरूप अंतरी
हळूवार या आठवणी क्षणात जाती बिलगुनी
ध्यास तुझा माझ्या मनी एकरूप अंतरी
हळूवार या आठवणी क्षणात जाती बिलगुनी

ही मने जुळली कशी मलाच ना उमगले
बहरल्या दशदिशा...
बहरल्या दशदिशा, रोमरोम फुलले
Hey, प्रिया सांगू कसे? कशी तुझ्यात गुंतले

गुंता असा झाला कसा ठावे ना हे मनी
गुंतता ह्रदयात या तुझेच नाव ओठावरी
गुंता असा झाला कसा ठावे ना हे मनी
गुंतता ह्रदयात या तुझेच नाव ओठावरी

न कळे मला अजुनी कसे वेड तुझे लागले
बहरल्या दशदिशा...
बहरल्या दशदिशा, रोमरोम फुलले
Hey, प्रिया सांगू कसे? कशी तुझ्यात गुंतले

प्रीती झरा आला असा, गेला तृप्त करूनी
माझ्या जीवा जाऊ नको, दूर तू ये परतुनी
प्रीती झरा आला असा, गेला तृप्त करूनी
माझ्या जीवा जाऊ नको, दूर तू ये परतुनी

जन्मात या आजन्म हे नाते असे जुळले
बहरल्या दशदिशा...
बहरल्या दशदिशा, रोमरोम फुलले
Hey, प्रिया सांगू कसे? कशी तुझ्यात गुंतले

Hey, प्रिया सांगू कसे? कशी तुझ्यात गुंतले
कशी तुझ्यात गुंतले, कशी तुझ्यात गुंतले

Credits
Writer(s): Nandu Honap, Rajan Laakhe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link