Hari Vajali Tujhi Basuri

हरी वाजली तुझी बासरी
धावत आली राधा
अशी कशी जादू केली सांग रे कान्हा

रंगून गेल्या वृंदावनी गोपगोपिका
कान्हा तुझ्या बासरीत दंग गोपिका
झाली सांज शोधू कशी वाट राना
परि तुझ्याविना कान्हा काही सुचेना

कान्हा अडवुनी वाट तू रे खातोस लोणी
कान्हा तुझा खोडकर खेळ हा भारी
कान्हा तुझ्या बासरीत मधुर ताना
होऊनी धुंद धुंदीत डोलती माना

रूप तुझे मोहणारे रंग सावळा
कान्हा तुझा लागला मला रे लळा
तुझ्या संगतीत दंग झाले मोहना
आनंद जाहला माझिया मना



Credits
Writer(s): Nandu Honap, Rajan Laakhe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link