Saptasoor Majhe

तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा
तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा
गाण्यास लाभला हा तंव स्पर्श अमृताचा
तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा

जागेपणी मी पाहिले ते सत्य सारे देखणे
जागेपणी मी पाहिले ते सत्य सारे देखणे
माझे मला आले हसू, आकाश झाले ठेंगणे

निमिषात सारे संपले...
निमिषात सारे संपले, हुंकार ये प्रितीचा
तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा

तू छेडिता माझ्या मना, तारा अशा झंकारल्या
तू छेडिता माझ्या मना, तारा अशा झंकारल्या
माझ्यासवे येताच तू दाही दिशा गंधाळल्या

हे हासणे अन लाजणे...
हे हासणे अन लाजणे, हा खेळ ऊन-पावसाचा
तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा
गाण्यास लाभला हा तंव स्पर्श अमृताचा
तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा



Credits
Writer(s): Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link