Mukya Hundakyache

मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे
छळावे स्वतःला, निखारे क्षणांचेच व्हावे
जडे जीव ज्याचा त्याच्याच का रे?
जडे जीव ज्याचा त्याच्याच का रे?
नशिबी असे घाव यावे

मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे
छळावे स्वतःला, निखारे क्षणांचेच व्हावे

इथे खिन्न तारा देई इशारा
आता साऊलीचा उरे ना निवारा
इथे खिन्न तारा देई इशारा
आता साऊलीचा उरे ना निवारा

मला मीच आता शोधित जावे

मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे
छळावे स्वतःला, निखारे क्षणांचेच व्हावे

कळू लागला अर्थ या जीवनाचा
आभास होता वेड्या सुखाचा
कळू लागला अर्थ या जीवनाचा
आभास होता वेड्या सुखाचा

मन पाखराने कुठे रे उडावे?

मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे
छळावे स्वतःला, निखारे क्षणांचेच व्हावे

उरी जागलेली ज्योती विझेना
नियती कुणाची कुणाला टळेना
उरी जागलेली ज्योती विझेना
नियती कुणाची कुणाला टळेना

कळीचे इथे का निर्माल्य व्हावे?

मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे
छळावे स्वतःला, निखारे क्षणांचेच व्हावे
जडे जीव ज्याचा त्याच्याच का रे?
जडे जीव ज्याचा त्याच्याच का रे?
नशिबी असे घाव यावे

मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे
छळावे स्वतःला, निखारे क्षणांचेच व्हावे



Credits
Writer(s): Pravin Davne, Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link