Te Sur Aikata

ते सूर ऐकता, ते सूर ऐकता
माझ्या मनी उमले क्षणी...
माझ्या मनी उमले क्षणी हळूवार गीतिका
ते सूर ऐकता, हा, ते सूर ऐकता

वेलीतरू, ही कलिका फुलांनी गंधाळल्या सांजवेळी
स्वप्नाळलेले दो जीव आपुले वेचित होते नव्हाळी
नयनातली वच्छले मला स्मरती, सख्या रे आता
हो, नयनातली वच्छले मला स्मरती, सख्या रे आता

ती भावना माझ्या मना...
ती भावना माझ्या मना हलकेच छेदिता
ते सूर ऐकता, ते सूर ऐकता

त्या सांजरंगी भरले कितीदा प्रणयातले रंग तेव्हा
रंगात होती किमया स्वरांची मृदुवेड लावीत जिवा
कळलेही ना विरली कधी ती सांज ना सांगता
हो, कळलेही ना विरली कधी ती सांज ना सांगता

तम आंधळा का दाटला?
तम आंधळा का दाटला? रे हाय संचिता
ते सूर ऐकता, ते सूर ऐकता

माझ्या मनी उमले क्षणी...
माझ्या मनी उमले क्षणी हळूवार गीतिका
ते सूर ऐकता, हा, ते सूर ऐकता



Credits
Writer(s): Shantaram Nandgavkar, Shank Shankneel
Lyrics powered by www.musixmatch.com

Link