Sahajach Hasle

सहजच हसले, सहज बोलले
सहजच हसले, सहज बोलले
सहजच घडले काही

प्रियाविना या जीवास माझ्या
प्रियाविना या जीवास माझ्या
सुचे ना आता, बाई
हा, सहजच हसले, सहज बोलले
सहजच घडले काही

संध्या समयी पाणवठ्यावर
भरता पाणी झाले कातर
संध्या समयी पाणवठ्यावर
भरता पाणी झाले कातर, झाले कातर

भय कंपित मी तरी अनावर
भय कंपित मी तरी अनावर
केली सखे, धिटाई
हा, सहजच हसले, सहज बोलले
सहजच घडले काही

अनोळख्याशी होता ओळख
हृदयी लागे ओढ अनामिक
अनोळख्याशी होता ओळख
हृदयी लागे ओढ अनामिक, ओढ अनामिक

कळले नाही मला कधी मी
कळले नाही मला कधी मी
उमलून आले, बाई
हा, सहजच हसले, सहज बोलले
सहजच घडले काही

जुळल्या भेटी, जुळल्या नजरा
विसरून गेले मी घरदारा
जुळल्या भेटी, जुळल्या नजरा
विसरून गेले मी घरदारा, मी घरदारा

हृदयी माझ्या आनंदाचा
हृदयी माझ्या आनंदाचा
मोहर फुलला, बाई
हा, सहजच हसले, सहज बोलले
सहजच घडले काही

प्रियाविना या जीवास माझ्या
प्रियाविना या जीवास माझ्या
सुचे ना आता, बाई
हा, सहजच हसले, सहज बोलले
सहजच घडले काही



Credits
Writer(s): Ram More, Shank Shankneel
Lyrics powered by www.musixmatch.com

Link