Andhari Raatra Sakhya

अंधारी रात्र सख्या झाली भवताली
अंधारी रात्र सख्या झाली भवताली
आठवणी ओले त्या...
आठवणी ओले त्या पुन्हा भोवताली
अंधारी रात्र सख्या झाली भवताली

भिजलेले दिवस पुन्हा मावळले रात्री
भिजलेले दिवस पुन्हा मावळले रात्री
सांज पुन्हा भिजलेली...
सांज पुन्हा भिजलेली, भिजलेल्या रात्री

ओघळले गीत पुन्हा...
ओघळले गीत पुन्हा भिजलेल्या गाली
अंधारी रात्र सख्या झाली भवताली

दूर-दूर शब्द तुझा हलकासा कानी
दूर-दूर शब्द तुझा हलकासा कानी
ओठावर पुसले रे...
ओठावर पुसले रे शब्द आसवांनी

पाय पुन्हा अडखळले...
पाय पुन्हा अडखळले जरा भूतकाळी
अंधारी रात्र सख्या झाली भवताली

पापणीत भाव पुन्हा भिजून चिंब गेले
पापणीत भाव पुन्हा भिजून चिंब गेले
हृदय पुन्हा दिव्य रसे...
हृदय पुन्हा दिव्य रसे न्हाउनी निघाले

क्षणिक तेच स्वप्न पुन्हा...
क्षणिक तेच स्वप्न पुन्हा दृष्ट जाग आली
अंधारी रात्र सख्या झाली भवताली

आठवणी ओले त्या...
आठवणी ओले त्या पुन्हा भोवताली
अंधारी रात्र सख्या झाली भवताली
अंधारी रात्र सख्या झाली भवताली



Credits
Writer(s): Shank Shankneel, Ashok G Paranjape
Lyrics powered by www.musixmatch.com

Link