Chal Jheluya Gaane

चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे
चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे
चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे

कांचन आशा बहरून आल्या, वयात आली राने
कांचन आशा बहरून आल्या, वयात आली राने, ओ

चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे
चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे

गर्भ रेशमी पाऊलवाटा कशा सुगंधी झाल्या
गर्भ रेशमी पाऊलवाटा कशा सुगंधी झाल्या
जळ थेंबाचा पाऊस नसुनी तिठी-तिठीतुन न्हाल्या
जळ थेंबाचा पाऊस नसुनी तिठी-तिठीतुन न्हाल्या

हे कुठले अमृत देणे, हे वासंतिक उखाणे
हे कुठले अमृत देणे, हे वासंतिक उखाणे
कांचन आशा बहरून आल्या, वयात आली राने, ओ

चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे
चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे

पदराचा कापूर जाहला हवेत उडतो, बाई
पदराचा कापूर जाहला हवेत उडतो, बाई
डोळ्यामधल्या स्वप्नावरती रंग शिंपूनी जाई
डोळ्यामधल्या स्वप्नावरती रंग शिंपूनी जाई
रंग शिंपूनी जाई, रंग शिंपूनी जाई

हे पंख नसुनी उडणे, हे वासंतिक उखाणे
हे पंख नसुनी उडणे, हे वासंतिक उखाणे
कांचन आशा बहरून आल्या, वयात आली राने, ओ

चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे
चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे

मंदिर झाले या हृदयाचे, दिशाच झाल्या बाहू
मंदिर झाले या हृदयाचे, दिशाच झाल्या बाहू
ओंजळीतला ऋतू फुलांचा कुठल्या चरणी वाहू?
ओंजळीतला ऋतू फुलांचा कुठल्या चरणी वाहू?

हे तुझेच अक्षरलेणे, हे वासंतिक उखाणे
हे तुझेच अक्षरलेणे, हे वासंतिक उखाणे
कांचन आशा बहरून आल्या, वयात आली राने, ओ

चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे
चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे

कांचन आशा बहरून आल्या, वयात आली राने
कांचन आशा बहरून आल्या, वयात आली राने, ओ

चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे
चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे



Credits
Writer(s): Pravin Davne, Shank Shankneel
Lyrics powered by www.musixmatch.com

Link