Nako Vel Kadhu

नको वेळ काढू आता धीर नाही
नको वेळ काढू आता धीर नाही
परब्रह्म रूप तुझे, परब्रह्म रूप तुझे

दावी लवलाह, दावी लवलाही
आता धीर नाही
नको वेळ काढू आता धीर नाही

वाचिली न गीता, देवा रचिली न गाथा
वाचिली न गीता, देवा रचिली न गाथा
तुझ्या चरणाशी माथा, इतुके पुण्याई
तुझ्या चरणाशी माथा, इतुके पुण्याई

इतुके पुण्याई, इतुके पुण्याई
आता धीर नाही
नको वेळ काढू आता धीर नाही

मिटू पाहती लोचने, होती तुझे भास
राखलेत तुझ्या पायी फक्त चार श्वास
लेकीचे जीवाला जशी माहेरची आस

सरो सासुरवास माझा बोलविगे माई
बोलविगे माई, आता धीर नाही
नको वेळ काढू आता धीर नाही

नको दाऊ आशा देवा, रामवू नको जीव
नको तुझी करुणा देवा, नको तुझी कीव
नको तुझे पंढरपूर, नको तुझी काशी
नको तुझी मोक्षमुक्ति, ठेव तुझ्यापाशी

नको तुझे गंध आता, नको तुझी माळ
नको तुझे नाम आता, नको तुझा टाळ
आ...
ए...

नको बोलू काही आता, नको-नको काही
नको झाले जगणे धाड बोलवा विठाई
बोलविगे माई, आता धीर नाही
नको वेळ काढू आता धीर नाही



Credits
Writer(s): Sameer Samant, Narendra Bhide
Lyrics powered by www.musixmatch.com

Link