Man Kara Re Prasann

मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण
मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन
सुख समाधान इच्छा ते

मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण

मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली
मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली
मने इच्छा पुरविली, मने इच्छा पुरविली
मन माऊली सकळांची, मन माऊली सकळांची

मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण

मन गुरू आणि शिष्य करी आपुलेचि दास्य
मन गुरू आणि शिष्य करी आपुलेचि दास्य
प्रसन्न आप आपणांस, प्रसन्न आप आपणांस
गती अथवा अधोगती, गती अथवा अधोगती

मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण

साधक, वाचक, पंडित, श्रोते, वक्ते ऐका मात
साधक, वाचक, पंडित, श्रोते, वक्ते ऐका मात
नाही-नाही आनुदैवत, नाही-नाही आनुदैवत
तुका म्हणे दुसरे, तुका म्हणे दुसरे

मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण
मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन
सुख समाधान इच्छा ते

मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण



Credits
Writer(s): Traditional, Kamlakar Bhagwat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link