Runjhun Paakhra

रुणझुण पाखरा रे, पाखरा...
रुणझुण पाखरा रे, पाखरा, जा माझ्या माहेरा
कमानी दरवाजा रे त्यावरी बैस जा
कमानी दरवाजा रे त्यावरी बैस जा

दादाला विचार जा, वहिनीला विचार जा
दादाला विचार जा, वहिनीला विचार जा
रुणझुण पाखरा रे, पाखरा, जा माझ्या माहेरा

भाज की लवंग, काकडी खमंग
भाज की लवंग, काकडी खमंग
तुमच्या मुलीला काय पाहिजे?
आमच्या मुलीला हार पाहिजे

तुमच्या मुलीला काय पाहिजे?
आमच्या मुलीला हार पाहिजे

उठी-उठी पाखरा, जा रे माझ्या माहेरा
रुणझुण पाखरा रे, पाखरा, जा माझ्या माहेरा

घराच्या गं वळचणी चिमणी घालते वेणी
घराच्या गं वळचणी चिमणी घालते वेणी
रांगोळीचा उंबरठा, दारी गायीचा गोठा
रांगोळीचा उंबरठा, दारी गायीचा गोठा

चुलीपाशी बसली माय
माझ्यासाठी दुधाची साय

रुणझुण पाखरा, निरोप घेऊन येई माघारा
रुणझुण पाखरा रे, पाखरा, जा माझ्या माहेरा
कमानी दरवाजा रे त्यावरी बैस जा
कमानी दरवाजा रे त्यावरी बैस जा

दादाला विचार जा, वहिनीला विचार जा
दादाला विचार जा, वहिनीला विचार जा
रुणझुण पाखरा रे, पाखरा, जा माझ्या माहेरा
रुणझुण पाखरा रे, पाखरा, जा माझ्या माहेरा
...जा माझ्या माहेरा



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link