Aad Bai Aad Suparicha Jhad

आड बाई, आड गं, सुपारीचं झाड गं
आड बाई, आड गं, सुपारीचं झाड गं
झाडाला आल्या शेंगा, अहो, झाडाला आल्या शेंगा
घाल गं पोरी, पिंगा, घाल गं पोरी, पिंगा

एकीचा की दोघींचा, डाव आला चौघींचा
डाव बाई, शेवटचा मामाजीच्या लेकीचा
मामाची लेक गोरी, हळद लावा थोडी
हळदीचा हुंडा, रेशमाचा गोंडा
हळदीचा हुंडा, रेशमाचा गोंडा

रेशीमगाठ हली ना, चिंचेखाली लोळे ना
चिंच बाई, गोड गं, जिभेला आला फोड गं
जिभेचा फोड फुटे ना, मामाची लेक उठे ना
जिभेचा फोड फुटे ना, मामाची लेक उठे ना



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link