Ekda Kaay Jhaale

एकदा काय झाले, एकदा काय झाले
आमच्या घरातले दिवे गेले
सगळीकडे काळोख मिट्ट
बाळाने पकडले आईला घट्ट

ताई दादाची झाली टक्कर
भित्र्या भगूबाईला आली चक्कर
बाबा आमचे सगळ्यात धीट
काळोखातून जरा नाही भीत

आजी गेली देवघरात
तिने लावली समयची वात
अंधार सगळा गेला पळून
समयची करामत आली



Credits
Writer(s): Traditional, Shri Takwardekar Guru Ji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link