Chal Re Bholya Tunauk

जंगल झाडीत वाघोबा लपला
म्हातारीला पाहून खुदकन हसला
म्हातारे, म्हातारे कुठे चाललीस
खाऊ दे मला आता भूक लागली

थांब, थांब वाघोबा मला जाऊ दे
लेकीकडचे लाडू मला खाऊ दे
लाडू खाऊन मी होईन ताजी
मग तू कर माझी खुशाल भाजी

दोन, चार दिवसांनी गम्मत झाली
भोपळ्यात बसून म्हातारी आली
वाघोबानं भोपळा अडविला
भोपळ्याच्या आतून आवाज आला

म्हातारी, कोतारी मला नाही ठाऊक
चल रे भोपळ्या टुनुक-टुनुक
चल रे भोपळ्या टुनुक-टुनुक
चल रे भोपळ्या टुनुक-टुनुक



Credits
Writer(s): Traditional, Shri Takwardekar Guru Ji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link