Paandara Paandara Rang Sanga

पांढरा, पांढरा रंग सांगा कशा कशाचा?
दूध, दही, ताक, लोणी आणि साखरेचा
काळाकुट्ट रंग सांगा कशा कशाचा?
फळा, पाटी, केस, कोळसा आणि कावळ्याचा

हिरवागार रंग सांगा कशा कशाचा?
पोपट, मिर्ची, केळी आणि कोथिंबिरीचा
लालभडक रंग सांगा कशा कशाचा?
जास्वंद, गुलाब, कुंकू, कमळ, आणि तिकटाचा

पिवळाधमक रंग सांगा कशा कशाचा?
केळ, पेरू, लिंबु, आंबा आणि हळदीचा
निळागडक रंग सांगा कशा कशाचा?
डेक्कन क्वीन, शाई, नीळ आणि मोराचा

जांभळा, जांभळा रंग सांगा कशा कशाचा?
जांभूळ, बोभाळ, कोराबी आणि कृष्णकमळाचा



Credits
Writer(s): Traditional, Shri Takwardekar Guru Ji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link