Maautaai Maautaai Maaiyashi

माऊताई, माऊताई माझ्याशी
खेळायला येतेस का बाई? येतेस का?
माऊताई, माऊताई माझ्याशी
खेळायला येतेस का बाई? येतेस का?

मला नाही काम, तुला नाही काम
मला नाही काम, तुला नाही काम
बागेत जाऊ, मजेत राहू
बागेत जाऊ, मजेत राहू
येतेस का बाई? येतेस का?

"गाल माझे मऊमऊ" जस तुझ अंग मऊ
"गाल माझे मऊमऊ" जस तुझ अंग मऊ
मऊमऊ हातांनी उचलीन तुला मी
मऊमऊ हातांनी उचलीन तुला मी
येतेस का बाई? येतेस का?

इवलासा सा चेंडू, इवलासा सा दांडू
इवलासा सा चेंडू, इवलासा सा दांडू
चेंडूच्या मागून जाऊया धावून
चेंडूच्या मागून जाऊया धावून
येतेस का बाई? येतेस का?

दमलीस जर, तर घरी जाऊ लवकर
दमलीस जर, तर घरी जाऊ लवकर
ताजा-ताजा मऊमऊ दूध, भात जेवू
ताजा-ताजा मऊमऊ दूध, भात जेवू
येतेस का बाई? येतेस का?

आजीची गादी निजायला आधी
आजीची गादी निजायला आधी
कुशीत घेऊन, जाऊया झोपून
कुशीत घेऊन, जाऊया झोपून
येतेस का बाई? येतेस का?

माऊताई, माऊताई माझ्याशी
खेळायला येतेस का बाई? येतेस का?
येतेस का बाई? येतेस का?
येतेस का बाई? येतेस का?



Credits
Writer(s): Traditional, Shri Takwardekar Guru Ji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link