Soubhagya Lavle Ga (From "Nanand Bhavjay")

सौभाग्य लाभले गं मज देव भेटला
लाखात मी सुखाचा संसार मांडीला
सौभाग्य लाभले गं...

छाया पित्याची मज सासऱ्यांची
मूर्तीच सासू गणमाऊलीची
लक्ष्मीचं आता सजविलं माझ्या घराला

सौभाग्य लाभले गं...

नणंद भोळी कळी गं जुईची
बहिणीपरी दे माया सुखाची
दैवात माझ्या येईल आता उजाळा

सौभाग्य लाभले गं मज देव भेटला
लाखात मी सुखाचा संसार मांडीला
सौभाग्य लाभले गं...

प्रीती पतीची जणू राघवाची
या वैभवाला उपमा कुणाची
लवकुशांना देईन येथे जिव्हाळा

सौभाग्य लाभले गं मज देव भेटला
लाखात मी सुखाचा संसार मांडीला
सौभाग्य लाभले गं...



Credits
Writer(s): Ashok Patki, Shantaram Nadgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link