Chal Ga Sai (From "Sasurwasheen")

चल गं सई, चल-चल बाई
गौराई आल्यात सोन्याच्या पायी
(गौराई आल्यात सोन्याच्या पायी)
(गौराई आल्यात सोन्याच्या पायी)

गौराई तुमची पुण्याई मोठी
चढून यावं अंगण ओटी
(गौराई तुमची पुण्याई मोठी)
(चढून यावं अंगण ओटी)

तुमच्या सांगाती लक्षमी येई
तुमच्या सांगाती लक्षमी येई
चल गं सई, चल-चल बाई
(गौराई आल्यात सोन्याच्या पायी)
(गौराई आल्यात सोन्याच्या पायी)

गौराई तुमचे पाऊलठसे
घरात-दारात उठले कसे?
(गौराई तुमचे पाऊलठसे)
(घरात-दारात उठले कसे?)

सुखाची बरसात अवघ्या ठायी
सुखाची बरसात अवघ्या ठायी
चल गं सई, चल-चल बाई
(गौराई आल्यात सोन्याच्या पायी)

हातात चुडा, कपाळी कुंकू
तुमच्या कृपेने काळाला जिंकू
(हातात चुडा, कपाळी कुंकू)
(तुमच्या कृपेने काळाला जिंकू)

झुकते पायी, ठेवते डोई
झुकते पायी, ठेवते डोई
चल गं सई, चल-चल बाई
(गौराई आल्यात सोन्याच्या पायी)
(गौराई आल्यात सोन्याच्या पायी)

काकणं-काकणं माझं मोत्याचं काकणं
(काकणं-काकणं माझं मोत्याचं काकणं)
नवखणी माडीत, हिरव्या साडीत नांदणं-नांदणं
मला अंबाबाईची राखण

(नवखणी माडीत, हिरव्या साडीत नांदणं-नांदणं)
(मला अंबाबाईची राखण)
काकणं-काकणं माझं मोत्याचं काकणं

सईबाई सांगू काही देवी अशी पूजिली
(सईबाई सांगू काही देवी अशी पूजिली)
पती माझा देवराजा स्वर्गसुख लाजली
(पती माझा देवराजा स्वर्गसुख लाजली)
सईबाई सांगू काही देवी अशी पूजिली

माझं सासर-सासर भर चौकात मोठा वाडा
(माझं सासर-सासर भर चौकात मोठा वाडा)
आंबेराईचं-राईचं सुख पिकून आलाया पाडा
(आंबेराईचं-राईचं सुख पिकून आलाया पाडा)

माझं सासर-सासर भर चौकात मोठा वाडा
(माझं सासर-सासर भर चौकात मोठा वाडा)



Credits
Writer(s): Bathth Paththsule
Lyrics powered by www.musixmatch.com

Link