Chandoba Chandoba Bhagalas Ka (From "Chandoba Chandoba Bhagalas Ka)

चांदोबा-चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
हा, निंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
चांदोबा-चांदोबा भागलास का?

आई-बाबावर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?
आता तरी परतुन जाशील का?
दूध अन् शेवया खाशील का?
दूध अन् शेवया खाशील का?

चांदोबा-चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
निंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
चांदोबा-चांदोबा भागलास का?

आई बिचारी रडत बसेल
बाबांचा पारा चढत असेल
असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?
अरे, बाबांची बोलणी खाशील का?

चांदोबा-चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
निंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
चांदोबा-चांदोबा भागलास का?

चांदोबा-चांदोबा कुठे रे गेलास?
दिसता-दिसता गडप झालास
हाकेला हाक माझ्या देशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?



Credits
Writer(s): Bhaskar Chandabarkar, Ga Madguththkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link