Aam Thanbo Thanbo (From "Irsha")

अगं थांब, थांब, थांब, अगं
अगं थांब, थांब, थांब जरा बांधावरण
जाऊ नको मोराच्या चाली
अगं-अगं जाऊ नको मोराच्या चाली

तुला बघून जवानी आली गं
तुला बघून जवानी आली
तुला बघून जवानी आली गं
तुला बघून जवानी आली

आरं, जा, जा, जा, जा रं
आरं, जा, जा, जा असं माझ्या मागन
येऊ नको खेकड्याच्या चाली
आरं-आरं, येऊ नको खेकड्याच्या चाली

तुला कशाची घाई झाली रं?
तुला कशाची घाई झाली?
आरं, तुला कशाची घाई झाली रं?
तुला कशाची घाई झाली?

तुला बघून आंब्याला कसा मव्हर येतोया
किती, किती येऊ मी लाडाला
जीव खालवर होतोया

अगं, लांब, लांब, लांब, ए
अगं, लांब, लांब, लांब नको जाऊ मर्दिनी
बोल जरा हसून गाली
अगं, तू बोल जरा हसून गाली

तुला कशाची घाई झाली रं?
तुला कशाची घाई झाली?
तुला कशाची घाई झाली रं?
तुला कशाची घाई झाली?

जरा बघ जा आईण्यात
तुझा मुखडा वसाड
सोड, धरू नको हात
मी रंगविन थोबाड

आरं, दम, दम, दम मुर्द्या
आरं, दम, दम, दम तुला दावते मी इंगा
कशानं सूदबुद गेली?
आरं, तुझी कशानं सूदबुद गेली?

तुला कशाची घाई झाली रं?
तुला कशाची घाई झाली?

जोडीदारीनं सोबलीस
माझं खेटार अडलंया
फार झुरणी लागलास
मी म्होतूर काढलाया

आरं, राम, राम, राम, देवा, देवा
आरं, राम, राम, राम ह्यो चिकाट बाकट
ईश्कात कोडं मला घाली
अहो, ह्यो ईश्कात कोडं मला घाली

तुला कशाची घाई झाली रं?
तुला कशाची घाई झाली?

मला लग्नाची घाई झाली गं
मला लग्नाची घाई झाली
आता मला लग्नाची घाई झाली गं
मला लग्नाची घाई झाली



Credits
Writer(s): Ram Kadam, Jagadish Khabandkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link