Chhedita Tu Taar

छेडिता तू तार
छेडिता तू तार, झंकारून गेले अंबर
छेडिता तू तार, झंकारून गेले अंबर
किन्नरी कंठात न्हाले
किन्नरी कंठात न्हाले सात वेडे किन्नर
सात वेडे किन्नर

छेडिता तू तार, झंकारून गेले अंबर
छेडिता तू तार

लाविता तू षड्ज, मंद्राने समाधी मांडिली
लाविता तू षड्ज, मंद्राने समाधी मांडिली
नीरजांची गंधनिद्रा
नीरजांची गंधनिद्रा चांदण्यांनी चुंबिली
चांदण्यांनी चुंबिली

छेडिता तू तार, झंकारून गेले अंबर
छेडिता तू तार

तू स्वरांचा स्वर्ग आरोहातूनी आरोहिला
तू स्वरांचा स्वर्ग आरोहातूनी आरोहिला
एक झुलता सूरसेतू
एक झुलता सूरसेतू अंतराळी बांधिला

छेडिता तू तार, झंकारून गेले अंबर
छेडिता तू तार

गाईली तू रागिनी, नागीन ही धुंदावली
गाईली तू रागिनी, नागीन ही धुंदावली
सुटून देठांची मिठी
सुटून देठांची मिठी आकाशपुष्पे वर्षिली
आकाशपुष्पे वर्षिली

छेडिता तू तार, झंकारून गेले अंबर
छेडिता तू तार



Credits
Writer(s): Suhasini Inlekar, Rahul Ghorpade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link