Geet Tujhe Gandhache

गीत तुझे गंधाचे
गीत तुझे गंधाचे गाऊ नको, गाऊ नको
गीत तुझे गंधाचे गाऊ नको, गाऊ नको
चंचल मन माझे तर
चंचल मन माझे तर त्यास पंख देऊ नको, देऊ नको
गीत तुझे गंधाचे गाऊ नको, गाऊ नको

सूर तुझे अमृतमय
सूर तुझे अमृतमय त्यात भाव ओतशील
मन माझे बंधमुक्त त्यास सखे उधळशील

सूर तुझे अमृतमय त्यात भाव ओतशील
मन माझे बंधमुक्त त्यास सखे उधळशील
त्यातून लावण्यमास
त्यातून लावण्यमास खुललेला कोषकोष
खुलले मन भुलले जर
खुलले मन भुलले जर देशील तू मजसी दोष, मजसी दोष

गीत तुझे गंधाचे गाऊ नको, गाऊ नको
गीत तुझे गंधाचे गाऊ नको, गाऊ नको

तान तुझी जरतारी
तान तुझी जरतारी सप्तकात मिरवू नको
तान तुझी जरतारी सप्तकात मिरवू नको
नादलुब्ध मन माझे, छंदातच बुडवू नको
गायचेच गात राहा
गायचेच गात राहा मात्र सांग एवढेच
गुंफीलेस जे स्वरात गीत गडे ना तुझेच, ना तुझेच

गीत तुझे गंधाचे गाऊ नको, गाऊ नको
गीत तुझे गंधाचे गाऊ नको, गाऊ नको
चंचल मन माझे तर
चंचल मन माझे तर त्यास पंख देऊ नको, देऊ नको
गीत तुझे गंधाचे गाऊ नको, गाऊ नको



Credits
Writer(s): Suhasini Inlekar, Rahul Ghorpade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link