Naman Natavara

नमन नटवरा विस्मय कारा | आत्म विरोगी कुतूहलधरा ||
विवाह करुनी मदन जाळीला | मग मदनमित्र इंदूसेविला||
धनवैरागी द्यूत खिळीला | गौरीचा जो अंकित झाला ||
परमेशाच्या ऐशा लीला | कवीकृष्ण गात विस्मयकारा ||

जशा जन्मती तेज घेऊन तारा |
जसा मोर घेऊन येतो पिसारा |
तसा येई कंठात घेऊन गाणे |
असा बालगंधर्व आता न होणे ||

प्रतीचे जया रूप लावण्य लाभे |
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे |
सुनेसारखा साद स्वर्गी अजाणे |
असा बालगंधर्व आता न होणे ||



Credits
Writer(s): Govindrao Tembe, G D Madgulkar, Kaushal S. Inamdar, K. P. Khadilkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link