Saang Hey Priye

सांग हे प्रिये
लपविलेस नयनी काय
सांग गे प्रिये

आठवणींचा पिंगा सतत चालतो
अंगावर रोमरोम फुलून येतो
काय अशी जादू करतेस तू प्रिये

पाहुनी तव चेहऱ्यास लाजली फुले
माझेही अंतरंग फुलून आले
किमया ही कैसी करतेस तू प्रिये

बोलावे वाटे पण शब्द येईना
ह्रदयामध्ये प्रीतीचा सूर माईना
सावरू कसे मना सांग गे प्रिये



Credits
Writer(s): Dr.shantaram Kudalkar, Shri Yashwant Dev
Lyrics powered by www.musixmatch.com

Link