Saang Sawlya Door

सांज सावल्या दूर पसरल्या थबकून पानोपानी
आठविता क्षण सुखद स्मृतींचे नयनी येई पाणी

ओढ अनोखी सूर आळवी शब्द गुंफुनी ओठी
दिन ना कळला कधी हरवला स्मरता स्मरता गाठी
बघता बघता हळूच लपली वसुंधरेची लेणी

क्षितीजावरती भिरभिर फिरती स्मृतीगंधांचे पक्षी
लुकलुकत्या तेजात तळपते नभांगणाची नक्षी
शांत शांत जळ तरंग बनुनी गाती सुस्वर गाणी

कातरवेळी गूढ पसरली किमया मंतरलेली
धूसर केली सगळी नाती अवनीवर जडलेली
अवखळ वारा मंद वाहुनी भिजवी संध्यारजनी



Credits
Writer(s): Dr.shantaram Kudalkar, Shri Yashwant Dev
Lyrics powered by www.musixmatch.com

Link