Ase Kase Hote Bare

असे कसे होते बरे सांगा मला कोणी
एका क्षणी गाली हसू दुसऱ्या क्षणी पाणी

अवचित कोणी एक भेटे जीवनात
कधी कसे गुंते जीव कळे ना क्षणात
मग कधी पापणीत होई जड पाणी

ज्याशी काही नाते नाही त्याची ओढ लागे
ज्याच्यावाचून क्षणही विराणसा लागे
अहो घाला समजूत वेड्याची या कोणी

कोणी नाही सांगितले कोणी नाही केले
कधीतरी आपोआप घडून ते गेले
कोणी याला म्हणती प्रेम वेडेपणा कोणी



Credits
Writer(s): Dr.shantaram Kudalkar, Shri Yashwant Dev
Lyrics powered by www.musixmatch.com

Link