Jeevna Re

जीवना रे मुखी जरा येऊ दे हसू
मुखी सदा राहू दे हसू

फुल उमलते मना फुलविते
गालावरचे आसू पुसते
कोमल सोबत घेऊन त्यांची
शांत इथे ये बसू

जीवन नश्वर तरीही जगूया
प्रवास येथील सुखकर करूया
जरी सदोदित माणुसकीला
कपट पाहते डसू

गिरीकपारी वनवन फिरसी
स्वत: स हरवून कुणा शोधिसी
व्यर्थ अशा खेळात रंगुनी
नको नको रे फसू



Credits
Writer(s): Dr.shantaram Kudalkar, Shri Yashwant Dev
Lyrics powered by www.musixmatch.com

Link