Raanamadhlya Falafulanche

रानामधल्या फळाफुलांची पंगत सजली जमली
किलबिलणारे थवे खगांचे आले, नाती जुळली

रंग अनोखे फळाफुलांचे इतुक्या जाती जमल्या
उडती पडती कधी धडपडती छान मैफिली सजल्या
बागडता अंबरी विहरता चंगळ सगळी झाली

जोड्या जमल्या जीवन फुलले घरटी झाडावरती
सुखदु: खे त्या ठावूक नव्हती घटिकांची ती नाती
चिवचिवणारी प्रजा तयांची जन्म घेऊन आली

चिवचिवणारे जीव जाहले व्याकूळ अन्नांसाठी
चारा जमवून मायपित्यांनी घास भरविले ओठी
बघता बघता तृप्त पाखरे आकाशात उडाली



Credits
Writer(s): Dr.shantaram Kudalkar, Shri Yashwant Dev
Lyrics powered by www.musixmatch.com

Link