Dhund Jhalelya

धुंद झालेल्या क्षणांना प्रेम तू देशील का?
सांग संसारास माझ्या साथ तू देशील का?

वादळी लाटास फुटली शुभ्र मौक्तिक पालवी
अन किनारी वायूसंगे घुमत आली भैरवी
या अशा बेधुंद वेळी सांग तू येशील का?

पसरल्या काट्यात फुलले स्वप्नसुमने भरजरी
दाटली हुरहुर तरीही आज माझ्या अंतरी
ह्रदय हे गोठून जाता ऊब तू देशील का?

मिलनाची वेळ आली संपवू साऱ्या व्यथा
विरह पर्वाची करू की आज पुरती सांगता
संचिताच्या या घडीचे गीत तू गाशील का?



Credits
Writer(s): Dr.shantaram Kudalkar, Shri Yashwant Dev
Lyrics powered by www.musixmatch.com

Link