Namaskar

रात्रीचा दिवसाचा पहाटेचा संध्येचा
छोटयांचा मोठ्यांचा
जीवनकारी सदा सहज संस्कार
नमस्कार नमस्कार

आईच्या डोळ्यातून ओघळली तेव्हा माया
मारकऱ्याचीही क्षणभर थरथरली तेव्हा काया
संपला जेव्हा ही प्रतिकार
समर्पणाचा सदा सहज आकार

अहंकार अन् गुर्मीची नाचतील ही भुते
नमस्काराविना स्वर्गही राहील दोन सुते
दोन सुतांचे अंतर सर करणार

नमस्कार करण्याची सदा संस्कृती राहो
जग लयास गेले तरीही नमस्कार हा राहो
सोहमचे त्यातूनच मग होईल स्वप्न साकार



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link