Jhir Jhirit

झिरझिरीत पडद्याआड संतूरच्या तारांवर
फुलपाखरू बसावे तिलासुद्धा स्पर्शावे
तार झंकारावी सूरांच्या तरंगांनी
पडद्यावर उमटावं तेव्हा तुझी आठवण यावी

पहाटेच्या वेळी चंद्राला, चांदणीला, सूर्यालाही फसवून
दवानं फुलावर उतरावं, फुलावर उतरून इवलेपण स्वत: चं खुशीन
ं, खुबीनं विसरावं
इवलेपण विसरून आभाळाची नक्षी सर्वांगावर रेखावी
तेव्हा तुझी आठवण यावी



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link