Dhund Dhund

नको नको नको
धुंद धुंद वारा नको
एकट्याला छळणाऱ्या पावसाच्या धारा नको
धुंद धुंद वारा नको शुक्राचा तारा नको
गीतही नको आणि कविताही नको
जर तू सांगू शकलास ते
तू मला आवडते

काट्याचा नि फुलाचा हा खेळाचा पसारा नको
वसंताची भाषा आणि चकोराची भाषा नको
गीतही नको आणि कविताही नको
जर तू सांगू शकलास ते
तुझी आठवण येते

केतकीचं वन नको डोलणारा मोर नको
उषेसाठी झुरणाऱ्या चंद्राची कोर नको
गीतही नको आणि कविताही नको
जर तू सांगू शकलास ते
तू मला आवडते



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link